प्रत्येकालाच आपल्या मुळांची ओढ असते, तिथलं कौतुक त्याला हवंहवंसं असतं...
मला मात्र माझी मुळं खुणावत होती. मुलगा मोठा झालेला, त्याला माझं आजोळ फिरवावं, त्यानिमित्तानं काही नातेवाईक भेटले तर भेटावं. माझा जन्म जिथं झाला आणि मी जिथं दर सुट्टीला येऊन बागडायचो, तो परिसर त्याच्याबरोबर हिंडावा असं मनापासून वाटत होतं. माझ्या घडण्याच्या काळात, अभावाच्या काळात मी तिथं बर्याचदा गेलो होतो, पण आता मी ज्या टप्प्यावर होतो, तिथून मला हे सगळं पुन्हा एकदा अनुभवायचं होतं.......